Top News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह मधले महत्वाचे मुद्दे......

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह मधले महत्वाचे मुद्दे......



विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई


💥 हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हा बाळासाहेबांनी दिलेला कानमंत्र आहे !


💥  मी वेळ देऊ शकत नव्हतो हे बरोबर.. कारण माझी शस्त्रक्रिया झाली होती !


💥  शिवसेना आणि हिंदुत्व वेगळं होऊ शकत नाही !


💥  शिवसेना कोणाची? अशी चर्चा कशाला ?
2014 ला शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीमध्ये 63 आमदार स्वबळावर निवडून आले ! बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनेच हे सगळे दिले !


💥  विधान परिषदेच्या निवडणूकीपूर्वी मी सगळ्या आमदारांना भेटलो.लघुशंकेला गेलो तरी शंका. ही कसली लोकशाही? ..सध्याचं राजकारण म्हणजे 'रडकुंडीचा घाट' !


💥  शरद पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारलं.पवारसाहेब, सोनियाजींनी विश्वास ठेवला !


💥  माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज ?


💥  मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनाचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद; फक्त मला हे समोरून येऊन सांगा !


💥  विरोधकांशी नव्हे तर जनतेशी आणि शिवसैनिकांशी बांधिल !


💥  आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे..राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतोय, मुंबईत यावं आणि राजभवनावर घेऊन जावं !

Previous Post Next Post