Top News

Democracy_under_threat_during_the_Mahavikas_Aghadi_government

 कोरपना येथे ठाकरे सरकार विरोधात जाहीर निषेध आंदोलन व पुतळा दहन कार्यक्रम 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात - नारायण हिवरकर



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना

  ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत बुलंद आवाज उठवणाऱ्या बारा आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीची हत्या केली आहे महाराष्ट्र सरकारचे हे धोरण दडपशाहीचे असून केवळ दोनच दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकूमशाहीचे धोरण असून हा लोकशाहीचा अपमान आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतोमहाराष्ट्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पुतळा दहन करण्यात आला  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले


यावेळी प्रमुख उपस्थिती  सतीश उपलचिंवार शहराध्यक्ष गडचांदूर, विशाल गज्जलवार,अरुण  मडावी सरपंच,संजय  मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष, नूतन कुमार जीवने पंचायत समिती सदस्य,अरुण  डोहे नगर सेवक गडचांदूर, मोरे   नगरसेवक गडचांदूर,अमोल आसेकर नगरसेवक कोरपना, ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव,ऍड पवन मोहितकर,

अनिल कवरासे शाखा अध्यक्ष कोरपना,शशिकांत अडकिने माजी सरपंच,हरि घोरे शहर महामंत्री गडचांदूर,संदीप शेरखी गडचांदूर, दिनेश खडसे युवा मोर्चा कार्यकर्ते, कार्तिक गोंडलावार युवा मोर्चा कार्यकर्ते, प्रमोद पायगन, मनोज तुमराम, साजिद उंमरे युवा मोर्चा कार्यकर्ते,अभय डोहे, हरबा झाडे, पद्माकर मडावी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

Previous Post Next Post