प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्मृती दिनानिमित्य आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
विदर्भ माझा न्युज 24 - ब्रह्मपुरी
जनसंघाचे संस्थापक वंदनीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्मृती दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र गांगलवाडी येथे दिनांक २३/६/२०२१रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देण्याचे महान कार्य या कर्मचाऱ्यांकडून झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी ग्रामीणच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुखदेवे मॅडम तसेच डॉ.किर्ती धनकर मॅडम तसेच श्री.आर. आर. धोटे सुपरवायझर तसेच श्रीमती एस. के. शेळके सुपरवायझर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा देखील गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर ,उपसभापती सौ. सुनीताताई ठवकर, तळोधीचे सरपंच श्री.अनिलजी तिजारे,मुईचे सरपंच श्री उमेशजी घुले,तळोधी चे उपसरपंच श्री संजयजी मारबते , श्री संजयजी भोयर ग्रा.पं.सदस्य गांगलवाडी, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री राजेश्वरजी मगरे,ज्येष्ठ नेते श्री गोपीनाथजी मोरांडे ,श्री.ज्ञानेश्वरजी दिवटे पाटील भाजपा युवा नेते, ,श्री.अविनाशजी मस्के भाजपा सोशल मीडिया प्रमुख इ. मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना वैद्यकीय अधिकारी डॉ.सुखदेवे मॅडम यांनी आभार मानून आमच्या कार्याची दखल घेतल्यामुळे आम्हाला अधिक काम करण्याची प्रेरणा यामुळे प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रामलाल दोनाडकर सभापती पंचायत समिती ब्रह्मपुरी यांनी केले यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवून कोरोनापासून कसे मुक्त करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला त्यामुळे यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान वाढवणे हा मुख्य उद्देश आहे .
या कार्यक्रमाचे संचालन अविनाश मस्के भाजपा सोशल मीडिया प्रमुख ब्रह्मपुरी ,तर आभार ज्ञानेश्वरजी दिवटे पाटील बल्लारपूर भाजपा युवा नेते यांनी मानले . भावना व्यक्त करताना म्हणाले की कोरोणा महामारीच्या काळात जवळचा नातेवाईक जवळ येत नव्हता परंतु आरोग्य कर्मचारी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या प्रकृतीची काळजी घेत होते त्यामुळे यांचे कार्य महान आहेत.कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.


