Top News

API Vikas Gaikwad's aggressive action ....

 API विकास गायकवाड यांची धडाकेबाज कार्यवाही....


बल्लारशाह बस स्थानक परीसरात तब्बल २२ कीलो गांजा जप्त..



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह

बल्लारशाह  शहरात आज सायंकाळी ५:०० / ५:३० च्या दरम्यान नव्या बस स्थानका जवळील सुभाष टॉकीज समोर बल्लारशाह पोलिसांनी एका इंडिका कार मधून 22 किलो गांजा (Cannabis)जप्त करून दोन आरोपींना अटक करून जागेवरच कार्यवाही करण्यात आली आहे.

बल्लारशाह पोलिसांना गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगाणा वरून  इंडिका कार क्रमांक TS-02FD-6090 मधुन मोठी गांजा (Cannabis)ची खेप येत असल्याची खात्री पूर्वक माहीती मिळाली त्या आधारे पोलिसांनी मुख्य मार्ग वर सापळा रचून सुभाष टॉकीज समोर कार ला अडविले व कारची झडती घेतली असता त्यात चक्क 22 किलो गांजा (Cannabis)जप्त करण्यात आला व तिथेच जागेवर कारवाई करण्यात आली असता मुख्य मार्गावर ये - जा करणाऱ्या नागरीकांची बघाव्याची गर्दी दिसून आली पहिल्यांदाच मोठया प्रमाणात गांजा पकडल्याची कार्यवाही जागेवरच करण्यात आली आहे, आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई नायब तहसिलदार कुलसंगे यांचा समक्ष उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारशाह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड,पोलीस उपनीरीक्षक चेतन टेम्भुरने, जीवतोडे मेजर, सतीश पाटील, ई. नी कारवाई केली आहे.

Previous Post Next Post