Dabangg पटवारी...मग कारवाई पन Dabangg.. On The Spot.
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन, राजुरा :-
अवैध्य उत्खनन करने हा दखल पात्र गुन्हा आहे,म्हणून या सहा ट्राक्टर मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करून, आतापर्यंत वर्धा नदीच्या पात्रातून चोरुन नेलेली रेती अंदाजे 1000/एक हजार ब्रास चा वर दंडात्मक कारवाई या सहा ट्राक्टर मालकाकडुन वसुल करन्यास पात्र आहेत,आणि तसा मि अहवाल वरिष्ठांना दिला आहे. मौक्यावर वर्धा नदीच्या पात्रातच सहा ट्राक्टर On The Spot जप्तीनामा केल्यामुळे,त्यांचावर निवळ ट्राक्टर मध्ये भरलेली एक ब्रासची रेतीची कारवाई नाही तर त्यांनी आजपर्यंत शेकडो ब्रास रेतीची चोरी केल्यामुळे त्यांचावर फौजदारी कारवाई साठी अहवाल सुद्धा पाठविले आहे,
आज त्यांची पेशी,माननीय तहसिलदार राजुरा यांचा कार्यालयात आहे .या रेती,वाळू तस्करीमध्ये,गनपत कुळे,युवराज कुळे,सुभाष पिंपळशेंडे,ईश्वर गोरे,राकेश देशमुख,यांनी आज माननीय तहसिलदार राजुरा यांचा प्रत्यक्ष समक्ष हाजर राहुन,पुराव्यासह आपले म्हणने मांडावे.अन्यथा दंडात्मक कारवाई सह फौजदारी कारवाई सुद्धा होऊ शकते,याची नोंद घ्यावी.
काही काही ट्राक्टर मला ओळखुन,मारडा गावाजवळुनच, दुरूनच पडुन गेले आहे,त्यांचाही नंबर एक दिवस लागनारच आहे.अवैध्य उत्खनन करने हा दखलपात्र गुन्हा आहे,दोन वर्षे जेल आणि दहा हजार दंड अशी तरतूद कायद्यात आहे,त्यामुळे या सहा ट्राक्टरवर फौजदारी कारवाई सुद्धा वरिष्ठांनी करावी,व तसे मी अहवालात दिले आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्कारवर आळा बसेल,आणि राष्ट्रीय संम्पतीचे रक्षन सुद्धा होईल. असे देखील विनोद खोब्रागडे यांनी म्हंटले आहे.



