Top News

सम्यक विद्यार्थी आंदोलन,बल्लारशाहची शिक्षण मंत्र्यांना मागणी,महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठांची 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षाची वार्षिक व परिक्षा फी माफ करा.

 सम्यक विद्यार्थी आंदोलन,बल्लारशाहची शिक्षण मंत्र्यांना मागणी,महाराष्ट्रातील सर्व  महाविद्यालय व विद्यापीठांची 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षाची वार्षिक व परिक्षा फी माफ करा.


विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह :- 

महाराष्ट्रातील सर्व  महाविद्यालय व विद्यापीठांची 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षाची वार्षिक व परिक्षा फी माफ करण्यात यावी. सम्यक विद्यार्थी आंदोलन, बल्लारशाहची शिक्षण मंत्र्यांना मागणी.

सध्या देशात कोरोणा महामारीमुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, अनेकांचे व्यवसाय बुडीला लागले, नोकऱ्या गेल्या, अनेक विद्यार्थाचे आधार हरपले, विद्यार्थाचे आर्थिक हाल झाले आहे.त्या मुळे विद्यार्थ्याकडे आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाही. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठाची  चालु शैक्षणिक वर्षाची वार्षिक व होणाऱ्या परीक्षाच्या फी माफ करण्यात याव्या.या साठी आज दि.25 मे ला वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, बल्लारपूर द्वारा मा. तहसीलदार बल्लारपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना स्वप्निल सोनटक्के, सिद्धांत पुणेकर, भोजेंद्र दुबे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post