Top News

बल्लारशाह शहरात दोन ठीकानी धाड..पोलीसांनी गांजा तस्करांना ‌ठोकल्या बेळ्या.....

 बल्लारशाह शहरात दोन ठीकानी धाड..पोलीसांनी गांजा तस्करांना ‌ठोकल्या बेळ्या.....



( विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक ) गौतम कांबळे,बल्लारशाह :-

दि. 16/05/2021 रोजी बल्लारशाह पोलीस ठाणे अंतर्गत  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड व पोशि/2887 अजय हेडाऊ  यांना मुखबिर कडून खबरी मिळाली की,  बल्लारशाह येथून चंद्रपूर येथे एक इसम गांजा घेऊन जाणार आहे व एक इसम सुभाष वॉर्ड बल्लारशाह येथे गांजा घेऊन येणार आहे. त्या प्रमाणे सापोनि गायकवाड, मुलाणी, Pro.पोलीस उपनीरीक्षक गिरीश व स्टाफ आणि  सहाय्यक  पोलीस निरीक्षक ठाकरे, रासकर,पोलीस उपनीरीक्षक टेंभुर्ने व पोलीस टीम अशा दोन टीम तयार करून साफळा रचून दोन ठिकाणी रेड केली असता त्या मध्ये  अप क्र. 566/2021 कलम 8, 20(ब)(2) NDPS , आं.कि. 42,500/- रु. चा एकुण 4.300 कि.ग्राम वजनाचा गांजा, आ. कि. 60,000/- रू ची  पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मो.सा, असा एकुण 1,02,500/- रू. चा माल जप्त करण्यात आला. 

सदर धाडीत पोलीसांनी दोन्ही आरोपींना बेळ्या ठोकल्या आहेत  अटक केलेल्या आरोची चे नाव  राजेश मदनलाल जोशी, वय-65 वर्ष, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चांदागड(चंद्रपूर ), अप क्र. 565/2021 कलम 8, 20(ब)(2) NDPS, आं.कि. 61,900/- रु. चा एकुण 6.240 कि.ग्राम वजनाचा गांजा,


आरोपीचे नाव  लालचंद गणेश केसकर, वय-59, सरदार पटेल वार्ड,बल्लारशाह असा दोन्ही रेड मध्ये एकुण  1,04,400/- रु.कि 10.540 की. ग्राम गांजा व  60,000/- कि. ची मो. सा. असा 1,64,400/-   माल मिळुन आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे, विकास गायकवाड, रमिज मुलाणी, प्रमोद रासकर, पोलीस उपनीरीक्षक चेतन टेंभुर्णी,पोलीस उपनीरीक्षक  गिरीश, पोहवा आनंद परचाके, जीवतोडे, चौधरी, चंदे, NPC सुधाकर वरघने, राजेश,बाबा नेताम, शरद कुडे, राकेश, प्रवीण, पो. शि अजय हेडाऊ श्रीनिवास वाभिटकर, दिलीप आदे, गणेश पुरढकर, शेखर माथनकर, किशोर, महिला शिपाई संध्या आमटे, सिमा पोरते यांनी केली आहे.

Previous Post Next Post