Top News

बल्लारशाह पोलीसांची धडक कारवाही ....

 बल्लारशाह पोलीसांची धडक कारवाही ....


1,20,000 रू कींमतीचा अवैद्य दारू साठा जप्त..




(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक) संजय घुगलोत,बल्लारशाह :-

दि. 14/05/2021 रोजी बल्लारशाह पोलीस ठाणे अंतर्गत  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांना RPF पोलिस बल्लारशाह यांचे कडून खबरी मिळाली की रेल्वे स्टेशन जवळील साईबाबा वार्ड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिला व एक पुरुष दारू घेऊन जात आहेत.  त्यावेळी  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड व त्यांचे टीम ने रेल्वे स्टेशन जवळील साईबाबा वार्ड कडे जाणाऱ्या रस्त्यावर, साईबाबा वार्ड येथे प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये  खालीलप्रमाणे माल जप्त  करण्यात आला आहे. आं.कि. 1,20,000/- रु. ची  3 बॅगमध्ये ऑफीसर चॉईस रिजार्व व्हिस्की कंपनीची तेलंगणा निर्मित  दारुच्या 600 नग बॉटल  मिळुन आल्या असा एकूण 1,20,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.


आरोपीची नावे  संतोषा असाला 2) लक्ष्मी गुल्लापेल्ली  3)  राकेश गुल्लापल्ली सर्व रा. विवेकानंद वार्ड,  बल्लारशाह जि. चांदागड(चंद्रपुर) सदरचा माल व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 557/2021 मदाका कलम 65(ई) 83 प्रमाणे  गुन्हा नोंद केला आहे.


Previous Post Next Post