पंडित दिनदयाल वार्डात बल्लारशाह पोलीसांची प्रोव्ही. रेड....
एकुन 05,69,000/- रु.किमतीचा मुद्देमाल जप्त....एक आरोपी अटकेत...
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-
आज दि. 17/05/2021 रोजी बल्लारशाह पोलीस ठाणे अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांना मुखबिर कडून खबर मिळाली की, आकाश डंगोरे हा आपले बोलेरो गाडी मध्ये दारू आणून विल्हेवाट लावत आहे. त्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड व त्यांचे टीम ने पंडित दिनदयाल वार्ड येथे प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये आं.कि. 69,000/- रु. की चे देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या 460 बॉटल मिळुन आल्या, आं.कि 5,00,000/- कि. महिंद्रा बोलेरो क्र MH-34-AM-8981जु. वा. असा एकूण 05,69,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.आरोपीची नाव आकाश आनंद डंगोरे रा. पंडित दीनदयाळ वार्ड, बल्लारशाह जि. चांदागड(चंद्रपुर) सदरचा माल व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 568/2021 मदाका कलम 65(ई)प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाही पोलीस निरीक्षक पाटील यांचे मार्गदर्शाखाली साहाय्यक पोलीस नीरीक्षक विकास गायकवाड, पोहवा आनंद परचाके, रणविजय ठाकूर, NPC शरद कुदे, सुधकर वरघने, दिलीप आदे, शेखर माथनकार, महिला शिपाई सीमा पोराते यांनी केली आहे.
