Top News

पोलीस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करावे - पोलीस बॉईज असोसिएशन.

 पोलीस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करावे - पोलीस बॉईज असोसिएशन.




 (विदर्भ माझा न्युज 24) चांदा :-   पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार पोलीस कल्याण निधीचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात पोलीस बांधवांसाठी कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू करावे या, मागणीचे निवेदन आज दिनांक 27 / 04 / 2021 रोजी पोलीस अधीक्षक चांदा (चंद्रपूर) यांचे मार्फत पोलीस महासंचालक संजय पांडे   यांना पोलीस बॉईज असोसिएशनचे चांदा(चंद्रपूर) जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे यांनी दिले, यावेळी निवेदन देताना चांदा (चंद्रपूर) जिल्हा संघटक सद्दाम अन्सारी , देविदास बोबडे शहर अध्यक्ष , साहिल मढावी जिल्हा उपाध्यक्ष , रिता शिंदे   महिला आघाडी जिल्हा उपसंघटक यांची उपस्थिती होती.

 

Previous Post Next Post