विदर्भ रत्न विर बाबुराव शेडमाके यांचा जयंती दीनी राज्य सरकार ने "आदिवासी अस्मिता दिन" म्हणुन आदरांजली वाहीली पाहिजे-मा.मधुसुदन कोवे.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे :- भारताला इंग्रजाच्या गुलामगीरीतुन मुक्त करण्यासाठी 1857 च्या युध्दात गोंड आणि परधान चे विदर्भातील विर सेना घेवुन लढा उभा करणारा विदर्भ विर योध्दा बाबुराव शेडमाके यांच्या 188 जयंती निमित्त राज्य सरकार के आदरांजली वाहीली पाहीजे.राज्याच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यानी "आदिवासी अस्मिता दिन" म्हणुन सन्मानित केले पाहीजे.
स्वातंत्र्य पुर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी त्याग आणि बलिदाना चं प्रतिक म्हणुन परधान गोंड समाजातील शहीद विदर्भ रत्न 12मार्च ला जन्माला आले अवघ्या 25व्या वर्षा त देशासाठी शहीद होनारे विर बाबुराव शेडमाके हे विदर्भ पुत्र विर रत्न आहे.आणि आणि आमच्या समाजातिल परधान गोंड लोकामधील सामाजिक अस्तित्वाचं प्रतिक आहे आज 12मार्च या जयंती पर्वावर ग्राम स्वराज्य महामंच चे मुख्य संस्थापक अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी विदर्भाच्या पवित्र पावनभुमी मध्ये जन्माला आलेले विदर्भ रत्न विर बाबुराव शेडमाके यांच्या आयुष्यातील 25वर्षा तील जिवन काय ग्राम स्वराज्य महामंच आणि विदर्भ ट्राईबल परीषद च्या सर्व सभासद यांना मार्गदर्शन केले.या आदरांजली कार्यक्रमात सहभागी मा.प्रा.मोहण वडतकर मा.गिरीधर ससनकर उच्च श्रेणी मुख्याध्यापक मा हरजित सिंह हंसराज झाडे इश्यू माळवे विठ्ठल राऊत दिनेश पोपट नितीन ठाकरे प्रल्हाद काळे बंडुजी पंधरे सौ.रेखा निमजे श्रुती देशपांडे आशा काळे पपिता माळवे माया कोवे सर्व पदाधिकारी विदर्भ विर बाबुराव शेडमाके यांच्या आदरांजली कार्यक्रमात उपस्थित राहुन कार्यालयात आदरांजली वाहीली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री ईश्यु माळवे यानी केले.
