जिवती तालुक्यातील टेकामांडवा गावात ३ शेतकऱ्यांच्या घराला अचानक लागली आग.
अचानक लागलेली आगी चे नुकसान भरपाई शासनाने द्यावी - सुदाम राठोड ( विराआंस तालुका अध्यक्ष ब्रम्हपुरी )
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,जिवती,चांदा :- जिवती येथे आज दुपारच्या सुमारास ३ शेतकऱ्यांच्या घराला अचानक आग लागल्याने गावात खळबळ उडाली होती. हळूहळू या आगीने रौद्र रूप घेतले, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान होत जनावरे सुद्धा जळून खाक झाली. जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथे सुमारे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने परशुराम व्यंकटी सोलंकर, सुरेश व्यंकटी सोलंकर, आणि शिवशंकर पीराजी तरडे, अशा तीन शेतकऱ्यांची घरे शेतात कामाला गेले असता अचानक घराला आग लागून संपूर्ण घरे जळून खाक झाली.
या प्रसंगाची माहिती मिळताच विदर्भ राज्य युवा आघाडी तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता एकूण १८ ते २० लाखाचा नुकसान झालं आहे, असे नमूद केल्यानंतर त्यांच्याकडून ५०० रुपयाची आर्थिक मदत दिली व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना फोन करून त्यांची नुकसान भरपाई शासना मार्फत करून द्यावी अशी विनंती केली.
सदर घटनेत शेतकर्यांची घरातील वस्तु, अनाज, सोने चांदीची दागिने, रोख रक्कम, घरातील कागद पत्रे, जनावरे गाय, वासरू, शेळ्या, मेंड्या, लोखंडी पत्रे संपुर्ण जळून खाक झाल्याने गावात हळ हळ पसरली आहे. सदर घटानेकडे शासनाने तत्काळ लक्ष देऊन मदत करावी अशी सुदामभाऊ राठोड यांची मागणी आहे.



