संपवेल प्रिमियर लिग शार्ट सर्कल क्रिकेट टुर्णामेंटच्या पारितोषिक वितरण संपन्न.
अंतिम सामन्यात विदर्भ क्रिकेट क्लब ठरला विजयी.
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह,जि.चांदा :- आज दि.०७ फरवरी २०२१ रोजी किल्ला वार्डातील संपवेल मैदानात संपवेल प्रिमियर लिग शार्ट सर्कल क्रिकेट टुर्णामेंटच्या पारितोषिक वितरण पार पडला, २ फेब्रुवारी ला सुरू झालेल्या संपवेल प्रिमियर लिग च्या आज समापन झाला. अंतीम फेरीच्या सामन्यात यंग वारियर्स क्रिकेट क्लब ने प्रथम बल्लेबाजी करत विदर्भ क्रिकेट क्लब ला ४९ धावांचा लक्ष दिला. रनाचा पाठलाग करत विदर्भ क्रिकेट क्लब चे ओपनर बल्लेबाज मृनाल पुरी व रोहन साठे यांनी धडाकेबाज शुरूवात देत मात्र ५.१ ओवरात आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
विजयी संघा व्यतीरिक्त मॅन ऑफ दि टुर्नामेंट मृनाल पुरी बॉलर ऑफ दि टुर्नामेंट अमित पारेकर, बेस्ट विकेट किपर हर्षल कोंडेकर, बेस्ट बॅटसमॅन रोहन साठे यांना देण्यात आला. विजयी संघ विदर्भ क्रिकेट क्लब ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष राकेश सोमानी यांच्या हस्ते ११,१११/- ची रोख रक्कम व ट्रोफी देण्यात आली, व उपविजेता संघ यंग वारियर्स क्रिकेट क्लब ला नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते ६,६६६/- ची रोख रक्कम व ट्रोफी देण्यात आली.
यावेळी सतीश कनकम, जितेंद्र गेडाम, विकास गायकवाड, ईत्यादीं ची उपस्थिती होती, यावेळी मार्गदर्शन करतांना हरीश शर्मा यांनी जिवनात खेळाडू प्रवृती निरंतर टिकवुन ठेवने हेच सुदृढ शरीराचा मंत्र आहे तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्यात नगर परिषद स्वास्थ्य विभागाच्या चमूने सांघिक कामगिरी करून व8जय मिळविला त्यामुळे खेळाद्वारे माणसाची शारीरिकच नव्हे तर मानसिक प्रगती सुध्दा होत असते असे उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करतांना म्हणाले.

