सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवार निवडल्याचा नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा आरोप.
उथळपेठ येथील तीन नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.
(विदर्भ माझा न्यूज 24 तालुका प्रतिनीधी ) संदीप तेलंग , मुल, जि . चांदा :- मुल तालुक्यातील उथळपेठ ग्राम पंचायतीच्या सात सदस्यांची निवडणुक अविरोध झाली.परंतु रविद्र सातपुते यांनी तीन सदस्यांना विश्वासात न घेता भाजापाचा आधार घेऊन सरपंच-उपसरपंच निवडून आणले.
त्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली. त्यामुळे नाराज झालेला तीन सदस्यांनि रविद्र सातपुते यांची ही कृती विश्वासlत न घेणारे तसेच विश्वासघात करणारी असल्याचा आरोप करून सुरेद्र चिचघरे, श्रीकांत बुरांडे आणि वर्षा वाढई यांनी आज सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष भाऊ रावत यांचे नेतृत्व स्वीकार करून तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश रत्नावार, विनोद कामडी,शांताराम कामडे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
