Top News

शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर रुग्णाला जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर तर्फे रू.४०००० चे मदत

शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर रुग्णाला जिल्हा मध्यवर्ती बँक, चंद्रपूर तर्फे रू.४०,००० ची मदत.                             

(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनिधी) संदिप तेलंग, मुल जि.चांदा : - मुल तालुक्यातील आकापुर येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश झुंगरू येरमे यांची पत्नी नम्रता रमेश येरमे वय ४५ यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याचे निदान झाले.  त्यांनी प्रावेट दवाखाने केले असता त्यांना डॉक्टरांनी सहा लाखाचा बजेट दिलेला आहे. परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असून यावर्षी त्यांना शेतीतून ही  नफा मिळाला नाही. त्यांना यावर्षी पिकातून निसर्गाने साथ दिलेला नाही. 


                             

कृषी उत्पन्न बाजार समिती मुल चे उपसभापती श्री संदीप कारमवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोष भाऊ रावत  यांच्याशी संपर्क साधून त्यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत मदत करण्याची मागणी केली. श्री . संदीप भाऊ कारमवार यांच्या मागणीची तत्परता दखल घेत बँकेचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ रावत यांनी शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर रुग्णाला रुपये 40000 मंजूर केले.                                  

आज दिनांक २२ फरवरी २०२१ ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मू ल  च्या वतीने मा. संतोष भाऊ रावत अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपुर यांनी मूल येथील बँक शाखेमध्ये आकापुर येथील शेतकरी श्री रमेश झुंगरू येरमे यांना बोलावून उपचाराकरिता बँकेच्या शेतकरी कल्याण निधी अंतर्गत रू.४०००० धनादेश मा.श्री संतोष भाऊ रावत यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी रुग्णाचे पती रमेश येरमे, श्री संदीप भाऊ कारमवार उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, नंदू भाऊ मडावी तसेच शाखा अधिकारी श्री. वाळके साहेब  उपस्थित होते.

Previous Post Next Post