Top News

राज्यात पुन्हा होणार लॉकडाऊन...???

राज्यात पुन्हा होणार लॉकडाऊन...???

महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन, व ८ दिवसांचा अल्टीमेटम.

( माझा न्यूज 24 :- उप संपादक) गौतम कांबळे, मुंबई, महाराष्ट्र):-  सर्वत्रवाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला आज सम्बोधिविदर्भत करतांना अनेक सूचना केल्या, या नुसार कोरोनाचे हॉट स्पॉट ठरत असलेल्या शहर व जिल्ह्यात पुढील सूचना पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या दरम्यान राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर प्रतिबंध घालण्यात आले असून आज दि.२१ फरवरी २०२१ ला राज्यभरात ६९७१ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली असून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. 



अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे, प्रत्येक नागरिकांनी कोरोणा पासून संरक्षण करतांना मॉस्क, सॅनिटाईझर, व सोशल डिस्टेंसिंग चे पालन करावे. सद्यस्थितीत राज्यभरात ९ लाखाच्या जवळपास कोरोना योद्धांना लसीकरण झाले असून नागरिकांनी याबाबत गाफील राहू नये असे आवाहन सुध्दा केले आहे.

तसेच राज्यभरात कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या जिल्ह्यात उद्या २२ फरवरी २०२१ पासून कडक निर्बंध लादण्यात येत असून पुढील आदेशापर्यंत वा कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात येईल पर्यत स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत तसेच राज्यभरातील नागरिकांना येत्या ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला असून, या दरम्यान च्या काळात नागरिकांनी मॉस्क व कोरोणा प्रतिबंधक उपाययोजना चा पालन करून कोरोणा नियंत्रणात आणण्यास मदत करावी अन्यथा राज्यभरात कडक लॉकडाउन च्या पर्यायाशिवाय मार्ग नाही अशा प्रकारचे सूचना केल्या आहेत.

Previous Post Next Post