माहूर तालुक्यातील सायफळ या गावात पेवर ब्लॉक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.
रस्त्यावर लावलेले पेवर ब्लॉक निघून रस्त्याच्या बाहेर.
(विदर्भ माझा न्युज 24 - प्रतीनीधी)माहुर :- माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ या गावात दोन महिन्यापूर्वी पेवर ब्लॉक चा रस्ता बनवण्यात आला होता. त्या रस्त्याचा निकृष्ट काम करण्यात आल्यामुळे त्या रस्त्यावर लावलेले पेवर ब्लॉक रस्त्याच्या बाहेर निघाल्या सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कामाला दोन महिने ही झाले नाही आणि रस्ता खराब व्हायला सुरू झाला आहे. गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचा काम केल्या मुळे हा रस्ता एवढ्या लवकर खराब झाला आहे. आणि ग्रामपंचायतच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनीरोडाच्या कामावर लक्ष दिले नसल्याने रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. पेवर ब्लॉक च्या खाली टाकलेल्या बेडाचे काम निष्कृष्ट दर्जाचे केले आहे कारण हा बेड माती सारखे बेड टाकण्यात आले होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या व सरपंचाच्या डोळ्यासमोर काम चालू असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले असे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक निघावं नाही याकरिता साईड ला बेड टाकण्यात आले होते. परंतु त्या बेडवर एक ते दोन वेळा पाणी टाकल्या च्या नंतर पाणी न टाकल्याने ते बेड फुटून पेवर ब्लॉक बाहेर निघायला सुरुवात झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सायफळ येथे काही दिवसांपूर्वी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी खाली बेड टाकलेले आहे. परंतु त्याच्यावर पंधरा दिवसापासून पाणी टाकलेला नाही आहे. ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंचांनी याच्यात काहीतरी घोटाळा केलेला आहे असा आरोप नागरिकांन कडून होत आहे.
