Top News

श्री गुरुदेव मानव सेवा बहुउध्देशिय संस्था राळेगाव यांच्या वतिने संत गाडगे बाबा यांची उत्साहात साजरी. - मधुसुदन कोवे गुरुजी

 श्री गुरुदेव मानव सेवा बहुउध्देशिय संस्था राळेगाव यांच्या वतिने संत गाडगे बाबा यांची उत्साहात साजरी. - मधुसुदन कोवे गुरुजी.




(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक) गौतम कांबळे,यवतमाळ :- श्री गुरुदेव मानव सेवा बहुउध्देशिय संस्था राळेगाव यांच्या वतिने संत गाडगे महाराज यांचा जयंती निमित्त ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.कृष्णराव राउळकर होते.कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते.कार्यक्रमाचे आयोजन मानवता मंदिर राळेगाव येथे करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मधुकरजी गेडाम सेवानिवृत्त तहसीलदार यांनी केले होते.

वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्हा शेनगाव येथे झाला त्यांच बालपन मुर्तीजापुर ता दापोरा येथे मामाकडे गेले.गाडगे महाराज यांचा संदेश संपूर्ण भारत सरकार ने

 "स्वच्छता संदेश" स्विकारुन भारत भर अभियान राबविले संताचा त्याग आणि कार्य आज ही लोकांना उपदेश देत आहे अशा या महान वैराग्यमुर्ती गाडगे महाराज यांचा अंत्यविधी अंत्य संस्कार या देशाचे क्रांतिकारी संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यानी केला.असे महत्वपूर्ण मार्गदर्शन मा.मधुसुदन कोवे गुरुजी यानी कार्यक्रमा प्रसंगी केले. 

मा.शंकरराव तोडासे यांनी "हे एक संत कैसे डेबुजी राज माझे" हे भजन म्हणुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.गिरीधर ससनकर सेवा निवृत्त मुख्याध्यापक यानी केले.या आयोजन सर्व श्री मा.वाल्मिकजी मेश्राम गुरुजी भगवंतजी धनरे गजानन गीरी मा.अंकुशजी राजकोल्हे नानाजी डफ सुधिर जी चौधरी बबनराव धोटे दत्ताजी मरस्कोले  सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळी उपस्थित होते आणि महिला मंडळ यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.वाल्मिकजी मेश्राम सचिव श्री गुरुदेव मानव सेवा बहुउध्देशिय संस्था राळेगाव यांनी केले

Previous Post Next Post