Top News

सुंदर माझे गाव अभियानांतर्गत सायफळ येथे ग्रामपंचायत स्वच्छ अभियान .

 सुंदर माझे गाव अभियानांतर्गत  सायफळ येथे ग्रामपंचायत  स्वच्छ अभियान .



(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,माहुर,जि.नांदेड :- माहूर तालुक्यात असलेल्या सायफळ  या गावात दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी  सुंदर माझे गाव अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.   सायफळ ग्रामपंचायत मध्ये नागरिकांना बोलवून आपले गाव स्वच्छ ठेवायचे आहे असे गावकऱ्यांना वायफळ गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विठ्ठल मारपल्लेवार यांनी गावकऱ्यांना सूचना दिली.

व गावकर्यांना सांगण्यात आले की जेवढा आपला गाव स्वच्छ राहील तेवढाच आपल्या आरोग्याला धोका कमी राहील आपल्या आरोग्य चांगले असले तर आपल्या जीवाला ताप सर्दी खोकला डायरिया यासारखे रोग  होणार नाही. गाव माझे सुंदर स्वच्छता अभियान ग्रामपंचायत  स्वच्छ करून राबविण्यात आला.  त्यावेळी सायफळ  गावातील ग्रामसेवक  विठ्ठल मारपल्लेवार,सरपंच रामराव आडे,  तंटामुक्ती अध्यक्ष अतीस शेख,  गजानन जयस्वाल, इसराइल शेख, गणेश कुठे, श्रीराम बुटले आधी गावकर यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post