गोंडराजे केशवशाह राजे आत्राम व त्यांचे मोकाशी किष्णजी कोटनाक है बल्लारशाह व चांदा च्या दौऱ्यावर असता, चांदा(चंद्रपूर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट.
बल्लारपूर व चंद्रपूर चे नाव बदलवून बल्लारशाह व चांदा करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल - गोंडराजे केशवशाह राजे आत्राम.
बल्लारशाह च्या इतिहास जोपासण्यासाठी खांडक्या बल्लाळशहा राजे यांचा पुतळा शहरात उभारण्यात यावा.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,चांदा,जि.चांदा :- गौंडराजे बल्लाळशाह राजे यांचे १५वे वंशज केशवशाह राजे आत्राम व त्यांचे मोकाशी किष्णजी कोटनाक है बल्लारशाह व चांदा च्या दौऱ्यावर असता, केशवशाह राजे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन चांदा व बल्लारशाह च्या काही महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
सर्व प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये चंद्रपुर व बल्लारपुर शहराचे पुर्व नाव चंद्रपुर चे चांदा तर बल्लारपुर चे बल्लारशाह होते व आज ही रेल्वे स्टेशन ला चांदा व बल्लारशाह हें नाव आहेत, तर मग विधान सभेत, शासकीय कार्यालयात, गूगलवर, गुगल माॅपवर, बल्लारशाह च्या जागी बल्लारपुर का? चांदा व बल्लारशाह या शहराचे स्थापना शिरपुर वरुण येउन आमच्या आजोबा पंजोबानी केली आहे. मात्र प्रशासन आमचा गोंड साम्राज्याचा इतिहास पुसत आहे. सरकार अणि प्रशासन दोन्ही मिळून जर गोंड साम्राज्याचा इतिहास पुसत असेल तर ते सरकार ला महागात पडेल. लवकरात लवकर चंद्रपुर च चांदा व बल्लारपुर च बल्लारशाह करण्यात याव अन्यथा तीव्र आंदोलन सह बल्लारशाह व चंल सगळ्या शासकीय कार्यालय वरील बोर्ड काढुन फेकुण देण्यात येइल आणि होणार्या नुकसानीला सरळ प्रशासन सरकार जवाबदार राहणार असे ठामपणे सांगण्यात आले.
तर सामोर चर्चा करताना केशवराव राजे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले की, बल्लारशाह शहराला एतीहासीक वारसा प्राप्त झाला आहे, बल्लाळशाह राजे च्या तिसरी पीढी खांडक्या बल्लाळशाहराजे यांनी शिरपुर वरून वर्धा व पैनगंगा नदीच्या संगमावर बल्लारशाह नामक नगरीची स्थापना केली व गोंडसाम्राज्याची राजधानी बनविली त्याच खांडक्या बल्लाळशाह च्या नगरीत आपण अनेक विकास कामे केली मात्र बल्लाळशाह राजे यांचे नाव आपण एकाही विकास कामाला दिलेली नाही, अथवा आपन गड व समाधी स्थळाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याच चित्र दिसत आहे.
आपण खांडक्या बल्लाळशाह राजे यांचे समाधी स्थळ व कील्ले यांचे पुनर्वसन करण्याकडे लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे आहे, येनार्या पिढीला हा इतीहास कळण्या करीता आपन तो आताच जपायला हवा जर तस होत नसेल तर प्रशासनाने खांडक्या बल्लाळशाह राजे यांचे सर्व गडकील्ले बल्लळशाह राजे यांचे वंशज केशवशाह राजे आत्राम यांच्या स्वाधीन करावे त्याचे जतन,संर्वक्षण व पुनर्वसन आम्ही करू.
अन्यथा एका राजाला स्वताच्या राज्यात स्वताच्या घराण्याच्या इतीहासा साठी आंदोलनाचा मार्ग पतकरावा लागेल ही वेळ येवु नये, परंतु आपन खांडक्या बल्लाळशाहराजे निलकंठशाहराजे यांचे समाधी स्थळ व कील्ले बल्लारशाह त्वरीत पुणर्वसन करण्या करीता लवकर पाऊल उचलावे अन्यथा संपुर्ण गोंड समाज तिव्र आंदोलन करेल. व बल्लारशाह च्या इतिहास जोपासण्यासाठी खांडक्या बल्लाळशाहराजे यांचे भव्य स्मारक उभारण्यास आपण लवकरात लवकर प्रयत्न करावा, असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

