Top News

गुरू नानक विज्ञान महाविद्यालय ची प्रा.योगिता बोडखे आचार्य पदवीने सन्मानित.

 गुरू नानक विज्ञान महाविद्यालय ची प्रा.योगिता बोडखे आचार्य पदवीने सन्मानित.



(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :-  बल्लारशाह येथील स्थानिक गुरू नानक विज्ञान महाविद्यालय येथे २सायनशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका योगिता गुलाबराव बोडखे यांना गोंडवाना विद्यापीठातर्फे आचार्य ( Ph.d) पदवी देऊन सन्मानित करण्यात आले . महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आठवा दिक्षांत समारंभ नुकताच गडचिरोली येथे संपन्न झाला . 


याप्रसंगी कुलगुरू, सिनेट सदस्य, प्राध्यापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते, "सिन्थेसिस अँड स्पेक्ट्रल स्टडीज ऑफ नॉन्हेल , फाईव्ह इमिडॅझोलोन , थाया झो लोडी नोन टू अॅसिडीटीनोन, वन.थ्री , फोर ऑक्सॉडॉयझोल अँड वन, थ्री, फोरथा या जया झोन अॅज ए पेटंह अँटी मायक्रोबील ओनन्ट " हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता. यासाठी त्याना डॉ. इदिस सिद्दीकी इन्सिटयूट ऑफ सायन्स महाविद्यालय नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वितेबद्दल संस्थापकध्यक्ष नागिंदर सिंह सोनी, प्राचार्य डॉ.बी.एम. बहिरवार, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.पी.बी. घोडे, प्राध्यापक वृंद  आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. हा समारंभ ऑनलाईन प्रक्रियेने पार पडला तर संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया करिता डॉ.इद्रिस सिद्दीकी यांनी गाईड केले.

Previous Post Next Post