बल्लारशाह शहरातील सर्व वीज ग्राहकांना व विदर्भवाद्यांना आग्रहाचे निमंत्रण - विराआंस, बल्लारशाह.
नगरपरीषद चौक बल्लारशाह येथे सकाळी 11 वाजता विशाल धरणे आंदोलन.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :- बल्लारशाह तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांना व विदर्भवाद्यांना कळविण्यात येते की 15 फेब्रुवारी 2021, सोमवार, सकाळी 11 वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती बल्लारशाह च्या वतीने "विशाल धरणे आंदोलन " नगरपरीषद चौक बल्लारशाह येथे घेण्यात येत आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या.
1) कोरोना काळातील वीज बिलातून जनतेला मुक्त करण्यात यावे.
2) 200 युनिट पर्यंत वीज फ्री करा.त्यानंतर चे दर निम्मे करा.
3) महावितरण द्वारे वीज ग्राहकांचे जबरदस्तीने वीज कनेक्शन कापण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय त्वरित मागे घ्यावा, महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचा विरोध व निषेध.
4) स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव गोरेवाडा प्राणी संग्रहालय, नागपूरला देण्याचा विरोध, हा निर्णय मागे घ्या, महाराष्ट्र सरकारचा निषेध.
5) अमरावती येथील मेडिकल कॉलेज ला त्वरित निधी देऊन काम सुरु करा, निधी पळविल्याचा निषेध
5) स्वतंत्र विदर्भाची त्वरित निर्मिती करा.
वरील सर्व मागण्या करता विशाल धरणे आंदोलनात वीज ग्राहक व विदर्भवाद्यांनी हजारो च्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार, उपाध्यक्ष संजय घुगलोत,सचिव गोतम कांबळे,शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,शहर सचिव संदीप केशकर,शहर उपाध्यक्ष सुनिल कलवला,शहर संघटक अविनाश गायकवाड,विभाग आध्यक्ष राकेश बहुरीया यांनी केले आहे.
दिनांक :-15-02-2021
वार :-सोमवार
वेळ :-दु:-11 ते 4 वाजेपर्यंत
स्थळ:-नगरपरीषद चौक बल्लारशाह
विनीत:-
रोहीत लोनारे
शहर अध्यक्ष विराआंस युवा आघाडी बल्लारशाह
80101 32508
