अटल डिजिटल सदस्य नोंदणीला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून मा.सुधीरभाऊंच्या संकल्पनेला पूर्ण करण्याचे काम करा.- आशिष देवतळे.
अटल डिजिटल ऍप भाजपा सदस्य नोंदणी संदर्भात बल्लारपूर शहर युवा मोर्चा ची बैठक संपन्न.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा :-दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी बल्लारपूर भाजपा कार्यालय मध्ये अटल डिजिटल ऍप भाजपा सदस्य नोंदणी संदर्भात बल्लारपूर भाजपा युवा मोर्चा शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष राजूजी दारी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथलेश पांडे, विशाल शर्मा, नगरसेवक येलय्या दासरफ,स्वामी रायबरम, ट्रान्सपोर्ट गाडी तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, भाजपा शहर सचिव संजय बाजपेयी, सतीश कणकम, जिल्हा सदस्य बबलू गुप्ता, अभिषेक सातोकर, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतीक बारसागडे, शहर महामंत्री घनश्याम बुरडकर, श्रीकांत आंबेकर,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आदित्य शिंगाडे, प्रकाश दोतपेल्ली, मोहित डंगोरे, गोलू सचदेवा, मनीष रामीला, रिंकु गुप्ता त्याच बरोबर अनेक भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

