Top News

विदर्भवाद्यांवर लावन्यात आलेले खोटे गुन्हे परत घ्या,अन्यथा विरांआस तर्फे संपुर्ण विदर्भात तिव्र आंदोलन करण्यात येईल - रोहीत लोनारे (शहर अध्यक्ष - विरांआस युवा आघाडी,बल्लारशाह)

 विदर्भवाद्यांवर लावन्यात आलेले खोटे गुन्हे परत घ्या,अन्यथा विरांआस तर्फे संपुर्ण विदर्भात तिव्र आंदोलन करण्यात येईल - रोहीत लोनारे (शहर अध्यक्ष - विरांआस युवा आघाडी,बल्लारशाह)


विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष एॅड.वामनराव चटप,राम नेवले,रंजना ममार्डे,मुकेश मासुलकर सहित ३४ कार्यकर्त्यांवर लावलेले खोटे गुन्हे परत घ्या ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदण.



(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा(चंद्रपुर) :-  विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ४ जानेवारी ला पाच हजार विदर्भवाद्यांचा व विज ग्राहकांचा विज व विदर्भ मार्च संविधान चौक ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरापर्यंत पायदळ पाच किलो मीटर विदर्भवाद्यांचा व विज ग्राहकांचा मोर्चा नेण्यात आला होता.

त्या वेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराजवळ ३०० विदर्भवाद्यांना अटक करून सुटका करण्यात आली.परंतु एका पोलिस काँन्स्टेबलच्या तक्रारी वरून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष आंदोलनाचे नेते,जेष्ठ विदर्भवादी, अँड. वामनराव चटप, मुख्यसंयोजक श्री. राम नेवले व विदर्भ प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे सह ३४ कार्यकर्त्यांवर खालील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे  गुन्हे दाखल करण्यात आले.यामध्ये ३५३,५०६,२९४, १८६, १४५, १४९,१८८,२६९,२७०  भा.द.वी १३५,,५१(ब) प्रमाने  गुन्हे दाखल करण्यात आले.हे सर्व विदर्भवाद्यांवरचे खोटे गुन्हे काढून घेण्यात यावे.या साठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा अघाडी बल्लारशाह शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी  ग्रुहमंत्री अनिलजी देशमुख यांची बल्लारशाह दवर्यावर असतांना यांना बालाजी‌ सभाग्रुह इथे स्वदीच्छ भेट घेऊन निवेदन दिले या वेळी युवा आघाडी शहर सचिव संदीप केशकर,शहर संघटक अविनाश गायकवाड सह असंख्य विदर्भवादी उपस्थीत होते.

Previous Post Next Post