गोडेवाडा उद्यानाचे नाम करण थांबवावे केशवशाहराजे यांचे शिष्टमंडळाचे मुख्यमंत्रांना व पर्यावरण मंत्रांना निवेदण.
नागपुर शहराचे संस्थापक गोंडराजे भक्त बुलंदशाहराजे यांचे नाव देण्याची मागणी.
प्रतापगडचे नामकरण करुण स्व.बाळासाहेब ठाकरे किल्ले प्रतापगड केले तर शांत बसणार का?
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा (चंद्रपुर) :- आज दि.२०/१/२०२१ ला महावीकास आघाडी सरकारचा निषेध करत मा.तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रि उद्धवजी ठाकरे व पर्यावरण,पर्यटक मंत्री आदीत्यजी ठाकरे यांना निवेदण देण्यात आले, महाराष्ट्र सरकार ने नवा जिआर काठला आहे त्यात विदर्भातील राजधानी नागपुर मध्ये असलेल्या गोडेवाडा उद्यानाला स्व.बाळासाहेबांचे नाव देण्याचा निर्णय महावीकास आघाडी सरकार ने घेतला आहे.याच निषेध आज बल्लारशाह शहरात राजेकेशाह आत्राम यांच्या शिष्टमंडळा मार्फत करण्यात आले, विदर्भाचा स्वतंत्र इतिहास आहे.
विदर्भ हा गोंडराज्यांचा अधीपत्या खाली होता,गोंड राजे भक्त बुलंदशाहराजे यांनि १७०२ मधे नागपुर नगरीची स्थापना केलि देवगढ़ वरुण नागपूर ला येउन भक्त बुलंदशाहराजे प्रथम यांनि शेजारील 12 गावे मिळवुन नागपुर ची स्थापना केलि ,आनी भक्त बुलंदशाहराजे यांचा कारकीर्दीत आदीवासी महीला सितागोंडीन या महीलेने हा गोरेवाडा तलाव व अभयारण्य स्वता विकसीत केले होते. म्हनुण याला गोडेवाडा नाव पडले, आनी सरकार मात्र आता या एतीहासीक वास्तुनचे नाव बदलवुन मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या वडीलांचे नाव देने कीतपत योग्य आहे.
मा.स्व.बाळा साहेब आनी विदर्भ या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत मग विदर्भातील गोंड राज्यांचा इतीहास पुसण्याच काम महाराष्ट्र सरकार ने सुरु केले का? चांदा जिल्हात(चंद्रपुर) वरोरानाका उडान पुलाला स्व.बाळासाहेबांचे नाव देण्यात आले चांदा शहर हे खांडक्या बल्लारशाह राजे आत्राम,हिरशाह राजे आत्राम,बिरशाहराजे आत्राम,हीराईराणी आत्राम अश्या एकुन १९ विर योद्ये या चांदा भुमीला लाभले यांचे नाव आपन उडान पुलाला देण्या एवजी आपन बाळासाहेबांचे नाव दिले .मात्र आता आपन परत नागपूर येथील गोडेवाडा चे नामकरण करत आहात मात्र त्याला आमचा विरोध आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे गोरेवाडा प्राणी संग्रहालय आहे. हे गोंडवानाचा भाग असल्यामुळे आणि तिथल्या गोंड समाजाची आदिवासी समाजाची मागणी असल्यामुळे या प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना नाव देण्याच मान्य करण्यात आले होते.
आमचा शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, प्रतापगडच नामकरण करुण स्व.बाळासाहेब ठाकरे किल्ले प्रताप गड केले तर शांत बसणार का? असा सवालच केशवशाहराजे यांच्या शीष्टमंडळाने उपस्थीत केला आहे, गोंड साम्राजात अनेक योद्ये झालेत आपन विदर्भातील गोंड साम्राज्याचा इतीहास वाचावा व योग्य निर्णय घेत गोडेवाडा उद्यानाचे नामकरण गोंड राजे भक्त बुलंदशाहराजे उद्यान करण्यात यावे. अशी मागनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व पर्यावरण/ पर्यटक मंत्री आदीत्यजी ठाकरे यांना तहसीलदार बल्लारशाह यांच्या मार्फत निवेदण देऊन करण्यात आली. या वेळी शिष्टमंडळात गोंडराजे केशवशाहराजे आत्राम यांचे सेनापती पराग गुंडेवार,संजय घुगलोत,संदीप केशकर,रोहीत लोनारे सह असंख्य सैनीक उपस्थीत होते.

