Top News

क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस समारंभ स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते

 क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस समारंभ 

स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते 


(विदर्भ माझा न्यूज 24 उपसंपादक गोतम कामड़े ) बल्लारपुर :-  स्थानिक बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे बल्लारपूर प्रीमियर लीग ( BPL सिझन 4)  तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

सादर स्पर्धेत 8 टीम चा सहभाग होता दिनांक 25 डिसेंबर पासून सुरू झालेली ही स्पर्धा IPL  पद्धतीनुसार खेळवण्यात आली. दिनांक 10 जानेवारी रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना MH 34-CC  विरुद्ध गेम स्वीनगर या टीम दरम्यान झाला त्यात गेम स्वीनगर टीम ने विजय मिळविला 

सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा नियोजन सभापती सुरेश वाघमारे,इस्माईलभाई ढाकवाला,ऍड. राजेश सिंग, तेंजेंदर दारी, ऍड मेघा भाले आदी  मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत उत्कृष्ठ खेडाळू म्हनून अमर नगराळे यांची निवळ करण्यात आली.

स्पर्धेच्या आयोजनाकरिता अध्यक्ष दीपक सौदागर, उपाध्यक्ष परवेज शेख, सचिव रिझवान ढाकवाला, संयोजक अजय रासेकर, सचिन धामणकर , गोपी ठाकूर, शुभम सौदागर, विनोद गिडवाणी,अनिल माडशेट्टीवर, मेजर अजित सिंग  बालू कोंडुकवर, अमर नगराळे, निलेश माहुरे, बबलू धुर्वे, इस्माईल शेख, अमरजित निषाद ,सचिन होंडो,शंकर तिलोकानी, आदींनी सहकार्य केले

Previous Post Next Post