Top News

विदर्भवाद्यांनवर लावण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरीत मागे घ्या विराआंस च्या शिष्टमंडळाचे ग्रुहमंत्रांना निवेदणा द्वारे मागनी.

 खोटे गुन्हे दाखल करणार्या  व    तक्रार देणार्या पोलीसांवर कारवाई करा - विराआंस



( विदर्भ माझा न्युज 24 - संपादक ) संजय घुगलोत,राजधानी नागपुर :-  विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ४ जानेवारी ला पाच हजार विदर्भवाद्यांचा व विज ग्राहकांचा विज व विदर्भ मार्च संविधान चौक ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरापर्यंत पायदळ पाच किलो मीटर विदर्भवाद्यांचा व विज ग्राहकांचा मोर्चा नेण्यात आला होता.


त्यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराजवळ ३०० विदर्भवाद्यांना अटक करून सुटका करण्यात आली.परंतु एका पोलिस काँन्स्टेबलच्या तक्रारी वरून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष,  आंदोलनाचे नेते,जेष्ठ विदर्भवादी, अँड. वामनराव चटप, मुख्यसंयोजक श्री राम नेवले व विदर्भ प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे सह ३४ कार्यकर्त्यांवर खालीलप्रमाणे गंभीर स्वरूपाचे  गुन्हे दाखल करण्यात आले.यामध्ये ३५३,५०६,२९४, १८६, १४५, १४९,१८८,२६९,२७०  भा.द.वी १३५,,५१(ब) प्रमाने  गुन्हे दाखल करण्यात आले.हे सर्व विदर्भवाद्यांवरचे खोटे गुन्हे काढून घेण्यात यावे.या साठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शिष्टमंडळ यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन देन्यात आले.तर त्यांच्याशी या संबंधीत सवीस्तर चर्चा करण्यात आली.हे खोटे गुन्हे सरकारने पुन्हा वापस घ्यावे,  व खोटे गुन्हे दाखल करणार्या, व तक्रार देणार्या पोलीसांवर कारवाई करण्यात यावी,असे निवेदन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले.


Previous Post Next Post