वन जमिनीच्या पट्ट्यासाठी व नवीन शेतकरी काळा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी यांना उलगुलान संघटनेचे निवेदन
वन हक्क कायदा मान्य करून जबरान जोत शेतकऱ्यांना पट्टे द्या:- राजू झोडे
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह(बल्लारपुर) जि.चांदा(चंद्रपुर) :- चांदा(चंद्रपूर) जिल्ह्यात मागील शेकडो वर्षापासून जिल्ह्यातील आदिवासी व इतर शेतकरी मायबाप वनजमिनी कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलाबाळांचे शिक्षण करतो आहे.मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तात्कालीन वनमंत्री महोदयांनी अनेक वनजमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टे देणार म्हणून आश्वस्त केलं होतं मात्र ते आश्वासन फोल ठरले आहे.कोरोना महामारी सारख्या संकटात शेतकरी बांधव सापडला असताना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.याही परिस्थितीत उधार, उसनवारी करून परत कुटुंबाच्या पुढील पालनासाठी पोटाची व खळगी भरण्यासाठी अतिक्रमित शेतकरी शेत जमीन कसतो आहे.मात्र अजून पर्यंत सुद्धा तत्कालीन वनमंत्री, विद्यामान पालकमंत्री यांनी प्रशासनाकडे पोशिंदा मायबापाच्या पोटाची खळगी भरणाऱ्या शेतजमिनीसाठी कोणताही निर्णय घेतला नाही.याउलट तुमचे अतिक्रमण काढून टाका या वनविभागाच्या भूमिकेला दुजोरा देत शेतकऱ्यांची पिळवणूक व थट्टा केली जात आहे.जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम २००६ च्या कायद्याची अंमलबजावणी यासंदर्भात होणारा अन्याय निवारणासाठी वन विभागाकडून होत असलेल्या बेकायदा कारवाईच्या विरोधात न्याय मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांसमवेत उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
१) अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासी कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांना लवकरात लवकर पट्टे देण्यात यावे.
२) कसत असलेल्या शेतात वहिवाट झाल्याशिवाय होणाऱ्या मुनार्या टाकू नये.
३)जंगलाला लागून असलेल्या शेतजमिनीत वन्यप्राणी शेतकरी त्याची नासधूस करीत असल्याने त्यापासून संरक्षण करण्याकरिता सोलर कुंपणाची व्यवस्था करावी.
४) जे शेतकरी पारंपारिक वननिवासी आहेत त्यांना २००६ कायद्याअंतर्गत वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे व २००६ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
५) नवीन शेतकरी काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा.
६) प्राचीन लेणी व मंदिर असलेल्या रामदेगी बुद्धविहारात व राम मंदिरात असंख्य श्रद्धाळू दरवर्षी येतात. अशा यात्रेकरूंना वनविभागाकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये तसेच राममंदिर व रामदेगी बुद्धविहाराला कायम पट्टे देण्यात यावे.
अशा विविध मूलभूत मागण्यांना घेऊन आपणास निवेदन देण्यात आले .सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वरील संपूर्ण न्यायिक मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा सर्व पीडित शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय पुढे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे, गिरीजाबाई धोंगडे, हरीभाऊ जुमनाके ,विठ्ठल लोनबले बंडु रामटेके, संजय भडके, देवराव देवतळे तथा अन्य शेतकरी उपस्थित होते.
