बल्लारशाह शहरातील पेपरमील मुळे होणारे प्रदूषण त्वरीत बंद करा :- राजू झोडे
प्रदूषणात होणारी वाढ कमी करण्यात आली नाही तर या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दीला
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह(बल्लारपुर) जि.चांदा(चंद्रपुर) :- बल्लारशाह शहरातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पेपरमिल मुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. हवेमध्ये उग्र वासाचे प्रमाण वाढलेले असून बल्लारपूर शहरातील वातावरणामध्ये यामुळे बदल झालेला आहे.याचा मोठ्या प्रमाणात त्रास बल्लारपूर शहरातील नागरिकांना व आजूबाजूच्या नागरिकांना होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचा व डोळ्यांचा त्रास होत असून आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. प्राप्त माहितीनुसार हवेच्या उत्सर्जनातून हायड्रोजन ड्रायसफ्लाईट व मिथाईल मॅराकॅप्शन हे विषारी वायू हवेत फेकले जात आहेत. हे वायू किती घातक आहेत व याचा मानवी आरोग्यावर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे ताबडतोब पेपरमिल मुळे होणारे प्रदूषण थांबविण्यात यावे व येथीचवावे करिता उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जर वरील मागणी तात्काळ मान्य करून प्रदूषणात होणारी वाढ कमी करण्यात आली नाही तर या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला.
निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे , भुषण पेटकर ,सचिन पावडे ,जॉकिर खान ,नविन डेविड कलवला , राजु काटम, पंचशिल तामगाडगे तथा उलगुलान संघटनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
