विराआंस नरखेड तालुकयाच्या मागणिला यश
वि.रा.आं. स. सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने प्रयत्नशील असेल-युवा तालुका संघटक प्रशांत तागडे
(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,नरखेड,नागपुर :- नरखेड वनपरीक्षेत्राअंतर्गत वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व वन्यप्राण्यांच्या हल्यात पाळीव प्राण्यांचे नुकसान भरपाई शेवटी ११ महिन्यांनंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा . बँकेकडून २० दिवसाचे वर विलंब झाल्यांनतर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा तालुका संघटक श्री प्रशांत तागडे यांनी बँक मॅनेजर शी संपर्क केले असता बँकेची मोठी घोडचूक लक्ष्यात आणून दिली आणि बँकेला ताकीद दिली जर दोन दिवसाचे आत शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दिली नाही तर विदर्भ राज्य आंदोलन समिती मोठं आंदोलन करेल. यावेळी शेतकरी आणि विदर्भ राज्य आंदोलन समितेचे कार्यकर्ते श्री पुरुषोत्तम हेलोंडे यांनी बँकेकडून होत असलेल्या विलंबाची बाब लक्षात आणून दिल्यानंतर हि कार्यवाही करण्यात आली. नरखेड तालुक्यातील १३५ शेतकऱ्यांना १२,९९,४६० रुपये RTGS द्वारे त्यांच्या खात्यात पाठवण्यात आले. अजूनहि ३२८ शेतकऱ्यांचे ३१,८५,३८९ रुपये नुकसान भरपाई येणे बाकी आहेत. त्यासाठी वि.रा.आं. स. सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने प्रयत्नशील असेल अशी हमी श्री. प्रशांत तागडे यांनी दिली.

