Top News

बल्लारशाह न.प तर्फे स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सायकल फेरी चे आयोजन

 बल्लारशाह न.प तर्फे स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सायकल फेरी चे आयोजन 

स्वच्छता अभियानामुळे देशात अमुलाग्र बदल दिसुन येत आहे- हरिष शर्मा (नगराध्यक्ष बल्लारशाह) 



(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,बल्लारशाह(बल्लारपुर) जि.चांदा(चंद्रपुर) :-  बल्लारशाह(बल्लारपुर) नगर परिषद द्वारा आज दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सायकल फेरी चे आयोजन नगराध्यश हरीश शर्मा व मुख्याधिकारी विजय सरनाईक सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी उपस्थितांना संबोधन करतांना मा.हरीश शर्मा यांनी सांगीतले की कार्यक्रमाचा मुख्य हेतु जनजागरण करण्यासाठी होता.बल्लारपुर नगर परिषदेने जनसहभाच्या बळावर महाराष्र्ट शासनाच्या  माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पारितोषिक पटकावला आहे.स्वच्छता अभियानामुळे देशात अमुलाग्र बदल दिसुन येत आहे.इंधन युक्त वाहणांच्या वापरामुळे कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमान वाढुन वायुप्रदुर्शन वाढतो करिता सायकल चा वापर जरी नित्य नेहमी करता येत नसले तरी किमान एक दिवस नागरिकांनी याचा अवलंबन करायला हवे.यावेळी नगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना त्यांनी विनंती केली की किमान एक दिवस त्यांनी सायकल चा वापर आॅफीसला येतांना करावे.


यावेळी नगर परिषदेचे उप मूख्याधिकारी काटकर ,मोटघरे ,नगर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी व नागरिकांनी या सायकल फेरी मध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन न.प.ची कार्यालय अधिक्षक श्रीमती संगीता उमरे यांनी केली.

Previous Post Next Post