Top News

आ.सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते वार्ड माझा-प्रयत्न माझा अंतर्गत वर्ष 2021च्या कॅलेंडर चे विमोचन संपन्न

 आ.सुधिर मुनगंटीवार यांच्या हस्ते वार्ड माझा-प्रयत्न माझा अंतर्गत वर्ष 2021च्या कॅलेंडर चे विमोचन संपन्न 


चार हजार कॅलेंडर वॉर्डातील घरो-घरी पोहचेल-जयश्री मोहुर्ले(नगर सेविका बल्लारशाह) 





(विदर्भ माझा न्यूज़ 24 - मुख्य उपसंपादक )रोहित लोनारे,बल्लारशाह,जी.चांदा(चंद्रपुर):-  दि.२५ डिसेंबर २०२०रोजी भारतीय जनता पार्टी चे आधारस्तंभ भारतरत्न श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती चे औचित्य साधून नगर सेविका जयश्री किशोर मोहूर्ले यांच्या वार्ड माझा-प्रयत्न माझा अंतर्गत वर्ष 2021च्या कॅलेंडर चे विमोचन आज बल्लारशाह चे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नाट्यगृह, बल्लारपूर येथे पार पडले.


सोबतच वॉर्डातील रक्त दातांना व ख्रिसमस च्या उपलक्षावर ख्रिश्चन परिवारांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बल्लारशाह चे नगराध्यक्ष हरिश शर्मा, माजी आमदार जेनुद्दीन जेवेरी,जैस्ठ नेते निलेश खरबडे, शिवचंद दिवेदी, न.प.उपाध्यक्षा मीना चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष काशीनाथ सिंग, महामंत्री मनीष पांडे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष  आशिष देवतळे, राजू दारी, अजय दुबे, समीर केने, येलय्या दासरप, रनंजय सिंग, वैशाली जोशी, सुवर्णा भटारकर, सारिका कणकम आदीची उपस्थिती होती.



Previous Post Next Post