गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात ११ जून रोजी नागरिक, महिला आणि व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून लक्ष्मी गेट ते पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी संतप्त नागरिकांनी चक्का जाम आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व कठोर शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत पीडितेला न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने तपास करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
🎤 विशेष प्रतिनिधी : संदीप तेलंग - 9823737684
