Top News

नागभीडचे ज्येष्ठ उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रामदास पुनाजी गिरीपुंजे यांचे निधन; उद्या शुक्रवारला अंत्यसंस्कार


नागभीड येथील ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे रामदास पुनाजी गिरीपुंजे (वय 89) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नागभीडसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मूळचे पालोरा, जि. भंडारा येथील रहिवासी असलेले रामदास गिरीपुंजे व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपूर्वी नागभीड येथे आले आणि नंतर ते येथेच कायमस्वरूपी स्थायिक झाले. आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी नागभीडच्या व्यापारी व सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.

गिरीपुंजे यांनी विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, नागभीडचे माजी कोषाध्यक्ष, व्यापारी संघ नागभीडचे माजी अध्यक्ष तसेच पूर्णचंद्र सॉ मिलचे संचालक म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात विविध सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी उपक्रमांना बळ मिळाले. व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

त्यांच्यावर शुक्रवार (दि.12जून) रोजी सायंकाळी 4.30 वाजता नागभीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, धार्मिक आणि व्यापारी संघटनांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post Next Post