Top News

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; कोटींचा दंड वसूल

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; कोटींचा दंड वसूल


भद्रावती / तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : चंद्रपूर जिल्ह्यातील महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. या मोहिमेत ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली.

सन २०२४–२५ या कालावधीत विविध ठिकाणी तपासणी मोहिमा राबवून ६४ वाहनचालक दारू पिऊन वाहन चालविताना आढळले. संबंधितांविरुद्ध न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

तसेच, ई-चालान प्रणाली, इंटरसेप्टर वाहन आणि ब्रीथ अॅनालायझर यंत्रांच्या साहाय्याने कारवाई अधिक प्रभावी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २०,३९६ प्रकरणांमध्ये तब्बल ₹१,७०,७९,७०० इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई सुरू असून, दंड न भरलेल्या प्रकरणांमध्येही कठोर पावले उचलली जात आहेत.

दरम्यान, उत्कृष्ट कामगिरीबद्दल महामार्ग पोलीस केंद्र, चंद्रपूर येथील माया चाटसे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महामार्ग पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. दारू पिऊन वाहन चालवू नये, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा तसेच वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवावी, असेही सांगण्यात आले. अपघाताच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post