Top News

नागपूरची सुरक्षा धोक्यात? गृहमंत्र्यांच्या शहरात डिटोनेटर्स आणि जिलेटिन कांड्यांचा साठा; नागपूरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा मुकेश मासुरकर यांची मागणी.

नागपूरची सुरक्षा धोक्यात? गृहमंत्र्यांच्या शहरात डिटोनेटर्स आणि जिलेटिन कांड्यांचा साठा; नागपूरच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा मुकेश मासुरकर यांची मागणी.



नागपूर | राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गजबजलेल्या दोसऱ भवन चौक परिसरात तब्बल ५० डिटोनेटर्स आणि १५ जिलेटिन कांड्या आढळून आल्याने शहराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ‘जय विदर्भ पार्टी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश मसूरकर यांनी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवर तीव्र टीका केली आहे. “ही घटना पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश असून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

स्फोटकांचा साठा सापडल्याने भीतीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून ही संशयास्पद बॅग त्या भागात पडून होती. इतक्या संवेदनशील ठिकाणी स्फोटके सापडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. या स्फोटकांचा उद्देश काय होता, ते कोठून आले, याचा तपास सुरू असून गुप्तचर यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

गुन्हेगारी वाढीमुळे नागरिकांमध्ये चिंता

नागपूरमध्ये अलीकडील काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अपहरण, हत्या, तसेच अमली पदार्थांची वाढती तस्करी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका निष्पाप बालकाच्या हत्येने शहर हादरले असून, रस्त्यावरच झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या हत्येने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह

शहरात राबविण्यात येणारे ‘ऑपरेशन थंडर’ निष्फळ ठरत असल्याची टीका होत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरलेला नसल्याचेही आरोप करण्यात येत आहेत.

आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही, तर ‘जय विदर्भ पार्टी’तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुकेश मसूरकर यांनी दिला आहे.

Previous Post Next Post