Top News

डॉ. काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभागात भव्य सत्कार

 डॉ. काशीनाथ सिंह यांचा वस्ती प्रभागात भव्य सत्कार





बल्लारपूर : डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल बल्लारपूर शहरातील वस्ती प्रभाग परिसरात डॉ. काशीनाथ सिंह यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.

गेल्या १५ ते २० वर्षांपासून डॉ. काशीनाथ सिंह हे जात, धर्म आणि प्रांत यापलीकडे जाऊन सातत्याने समाजसेवा करत आहेत. परिसरात २४ तास रुग्णवाहिका   सेवा उपलब्ध करून देणे, कोरोना काळात स्वतः तीन वेळा बाधित होऊनही कार्य सुरू ठेवणे, तसेच खासगी आर.टी.पी.सी.आर. केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

याशिवाय युवकांना क्रीडा व शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देणे, जनजागृती करणे आदी उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉक्टरेट मिळाल्यानंतर बल्लारपूर, पोमुरना व चंद्रपूर येथे विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत असून, गेल्या दोन आठवड्यांपासून सत्कार सोहळ्यांची मालिका सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वस्ती प्रभागातील गणपती बिछायत केंद्र येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला रामधन सोमानी, हनुमान सिंह खेंगर, राजू मुंदडा, सुनील जैन, कैलाश गुप्ता, हाजी उस्मान, अरविंद झाडे, आबिद, लियाकत अली, मिथिलेश खेंगर, रामेश्वर पासवान, चंदन गहरवार, परविंदर अरोरा, गोपाल अरोरा, अमूल रणदिवे, गुलाब यादव, मुन्ना बहुराशी, गोलू रहिक्वार, कमलेश केशकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. काशीनाथ सिंह यांना पुष्पगुच्छ, शाल व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.

Previous Post Next Post