Temple Drug Racket Exposed : मंदिर परिसरात झेंडूच्या आड गांजाची लागवड, पुजारी अटकेत; ₹70 लाखांचा गांजा जप्त
हैदराबाद | तेलंगणा राज्यात Telangana Crime News अंतर्गत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून देवभक्तीच्या आडून Illegal Ganja Farming सुरू असल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. संगारेड्डी जिल्ह्यातील एका मंदिर परिसरातून पुजाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 70 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील नारायणखेड तालुक्यातील पंचगाम गावातील मंदिराचा पुजारी अवुती नागैया (वय 48) हा स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणून सादर करत होता. मात्र तो मंदिराच्या पवित्र परिसरात झेंडूच्या फुलांच्या आड गांजाची लागवड करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मंदिर परिसरात झेंडूच्या रोपट्यांमध्ये गांजाची रोपटी लावण्यात आली होती. बाहेरून पाहता ही फुलांची शेती असल्याचा भास होत होता; परंतु प्रत्यक्षात त्याआड मोठ्या प्रमाणावर गांजाची अवैध शेती सुरू होती. हा प्रकार बराच काळ सुरू असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मंदिर परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. या छाप्यात पुजाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले असून संपूर्ण शेतीचा पर्दाफाश करण्यात आला.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पुजारी भाविकांचा विश्वास संपादन करून गांजाची शेती व विक्री करत होता. गांजाची पाकिटे तयार करून ती विकली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छाप्यात पोलिसांनी गांजाची 685 रोपटी, साडे सतरा किलो सुका गांजा, जवळपास एक किलो गांजाच्या बिया, 30 हजार रुपयांची रोकड, एक डिजिटल वजनकाटा व एक मोबाईल असा एकूण सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण तेलंगणात खळबळ उडाली असून Temple Drug Racket प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
