Top News

Bhadrawati Police Action : गांजाची वाहतूक करणारे दोघे अटकेत, ₹1.62 लाखांचा मुद्देमाल जप्त

 Bhadrawati Police Action : गांजाची वाहतूक करणारे दोघे अटकेत, ₹1.62 लाखांचा मुद्देमाल जप्त




भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार :  नागपूर–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरून गांजासदृश अंमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी मानोरा फाटा परिसरात नाकाबंदी करून कारवाई केली. या कारवाईत दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १ लाख ६२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल-काळ्या रंगाची जुनी वापरती होंडा शाईन दुचाकी (क्र. एमएच ४० सीएन ३९६६) थांबवून तपासणी केली असता आरोपी क. २ च्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेत ३ किलो ११६ ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे ६२ हजार ३२० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आरोपी क. १ हर्षल राजेंद्र रक्षित (वय २४, रा. पंचशील नगर, काटोल, जि. नागपूर) व आरोपी क. २ अंशुमन रवींद्र वीर (वय २४, रा. येनवा, ता. काटोल, जि. नागपूर) अशी आहेत. यांच्याकडून गांजासदृश अंमली पदार्थासह वाहतुकीसाठी वापरलेली होंडा शाईन दुचाकी (किंमत अंदाजे ७० हजार रुपये) व दोन अँड्रॉइड मोबाईल (किंमत अंदाजे ३० हजार रुपये) असा एकूण १ लाख ६२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, मोहन धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर तसेच महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, जगदिश झाडे, धर्मराज मुंडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोडे व कोमल मोहजे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post