Top News

SAIL-चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटकडून CSR अंतर्गत 25 महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण; महिला सक्षमीकरणाला मोठी चालना

 SAIL-चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटकडून CSR अंतर्गत 25 महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण; महिला सक्षमीकरणाला मोठी चालना





बल्लारपूर : Steel Authority of India Limited अंतर्गत कार्यरत Chandrapur Ferro Alloy Plant यांनी Corporate Social Responsibility उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणाला चालना देत 25 महिलांसाठी Bamboo Handicraft Training Project यशस्वीरीत्या पूर्ण केला. हा उपक्रम Sara Bahuuddeshiya Sanstha, चंद्रपूर यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

प्रशिक्षण पूर्णता प्रमाणपत्र वितरण सोहळा बल्लारपूर येथील गोपाला पॅलेस येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात किरण जुंघारे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. पी. मुरुगेशन, कार्यकारी संचालक, CFP यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी उमेश एम. उके, डीजीएम HR, SAIL-CFP यांनी CSR उपक्रमांची माहिती देत महिलांच्या कौशल्य विकास व उपजीविका निर्मितीसाठी CFP ची बांधिलकी अधोरेखित केली.

प्रशिक्षणार्थी शबनम परवीन शेख, अंजुम पठाण आणि पूजा अक्कापक्का यांनी अनुभव मांडत रोजगारक्षम कौशल्य मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

समुदाय प्रतिनिधी सिक्की यादव, घनश्याम मुलचंदानी व चैथाली मुलचंदानी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रमाणपत्र वितरण पी. मुरुगेशन, कार्यकारी संचालक; डी.व्ही. रवि चंदर, सीजीएम मेंटेनन्स व अतिरिक्त प्रभार सीजीएम M&C; के.एस. सुरेश, सीजीएम प्रोजेक्ट; आर.डी. गायकवाड, सीजीएम वर्क्स; एल. प्रवीण कुमार, जीएम प्रभारी HR; तसेच शोभा शिवशंकरन, जीएम प्रभारी F&A यांच्या हस्ते करण्यात आले.

भाषणात पी. मुरुगेशन यांनी सांगितले की SAIL–CFP चे उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे सक्षमीकरण करणे आहे. प्रशिक्षित महिला आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारतील तसेच स्वतःचे उद्योग व उत्पादन केंद्र सुरू करून उद्योजक बनतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी शिखा दास यांनी आभार प्रदर्शन केले.

हा उपक्रम SAIL-CFP च्या CSR धोरणांतर्गत राबविण्यात आला असून स्थानिक महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Previous Post Next Post