Top News

Public Health Alert : हत्तीरोग निर्मूलनासाठी सर्वांनी औषधांचे सेवन करा...आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

 Public Health Alert : हत्तीरोग निर्मूलनासाठी सर्वांनी औषधांचे सेवन करा...आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन



चंद्रपूर | सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या हत्तीरोग निर्मूलनाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. आरोग्य विभागाकडून दिली जाणारी प्रतिबंधात्मक औषधे वेळेवर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत राष्ट्रीय हत्तीरोग दूरिकरण कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत Universal Mass Drug Administration (MDA) मोहीम राबविण्यात येत आहे. हत्तीरोग (Filariasis) निर्मूलनासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

दोन वर्षांखालील बालके, गर्भवती माता व गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्ती वगळता सर्व पात्र नागरिकांना सुरक्षित व प्रभावी प्रतिबंधात्मक औषधे देण्यात येणार आहेत. रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही औषधे न चुकता सेवन करणे आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व स्थानिक प्रशासनाने या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन केले. आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच गोळ्या घ्याव्यात आणि त्या उपाशीपोटी घेऊ नयेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक घरापर्यंत पोहोचणाऱ्या आरोग्य पथकांना सहकार्य करून औषध सेवन केल्यास हत्तीरोगमुक्त महाराष्ट्र घडविणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post