Maheshwari Samaj Chandrapur Adhiveshan 2026 | चंद्रपूरमध्ये माहेश्वरी समाजाचे जिल्हा अधिवेशन संपन्न
डॉ. जुगलकिशोर सोमानी व हेमलता सोमानी यांना ‘समाज भूषण सन्मान’ प्रदान
चंद्रपूर : शहरातील महेश भवन सभागृहात माहेश्वरी समाजाच्या वतीने जिल्हा अधिवेशनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या अधिवेशनात समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके प्रमुख उपस्थित होते. त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधत समाजातील एकता, सेवाभाव, शिक्षण व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.
यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया उपस्थित होते. त्यांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी परस्पर सहकार्य, संतुलन व सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. तसेच शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाजाची वाढती सहभागिता कौतुकास्पद असल्याचे सांगून भविष्यात अधिक योगदान देण्याचे आवाहन केले.
अधिवेशनादरम्यान माहेश्वरी समाजाच्या वतीने समाजसेवा क्षेत्रात मागील ५० वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण व निस्वार्थ सेवा बजावल्याबद्दल डॉ. जनककिशोर सोमानी व हेमलता जनककिशोर सोमानी यांना “समाज भूषण सन्मान पत्र” प्रदान करून गौरविण्यात आले.
सन्मानपत्रात नमूद करण्यात आले की, या दाम्पत्याने कर्तव्यनिष्ठा, उच्च शिक्षित विचारसरणी, गौसेवा, सामाजिक समरसता, गरजू व वंचित घटकांना मदत, शिक्षण व सेवा कार्यांच्या माध्यमातून समाजात प्रेरणादायी योगदान दिले आहे. त्यांनी सेवेलाच आपला धर्म मानत कार्यांचे श्रेय स्वतःकडे न घेता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले आहेत.
या सन्मान सोहळ्यात विदर्भ प्रांतीय माहेश्वरी सभेचे मंत्री अजय मोदानी, जिल्हाध्यक्ष शिवनारायण सारडा, अधिवेशन चे संयोजक डॉ सुशील मूंधड़ा, जिला सचिव अजय काबरा, तालुका अध्यक्ष उमेश चांडक, मार्गदर्शक दिनेश बजाज, जिल्हा महिला संगठन चे अध्यक्ष राधिका मुंधडा, सचिव ज्योति मूंधड़ा ,युवा संगठन चे अध्यक्ष ऋषिकांत जाखोटिया, सचिव रुपेश राठी, चंद्रपुर माहेश्वरी महिला मंडळ च्या अध्यक्षा अलका चांडक, सचिव रानी कांकाणी, चन्द्रपुर माहेश्वरी युवक मंडल च्या अध्यक्ष गोविंद राठी, सचिव अनूप गांधी तथा सभी पदाधिकारी सह कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील माहेश्वरी समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी, मातृशक्ती तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. समाजाच्या वतीने डॉ. जुगलकिशोर सोमानी व हेमलता सोमानी यांचा स्नेहपूर्वक सत्कार करण्यात येऊन त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील काळातही अशीच समाजसेवा सुरू राहावी, अशी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मंत्री यांनी केले तर अजय काबरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
