Mahashivratri Mahotsav 2026 Nagbhid : शिवटेकडी येथे १५ ते २६ फेब्रुवारीदरम्यान भव्य आयोजन | Shivtekdi Festival Update
नागभीड : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शिवटेकडी, नागभीड येथे दि. १५ ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान महाशिवरात्री महोत्सव २०२६ Nagbhid भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. मा. आमदार किर्तिकुमार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शन व विशेष सहकार्याने धार्मिक, सांस्कृतिक तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांची मोठी मेजवानी नागभीडकरांना अनुभवता येणार आहे.
उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित १५० कलावंतांचा सहभाग असलेले ‘शिवगाथा’ ऐतिहासिक महानाट्य Shivgatha Historical Drama शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सादर होणार आहे. भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी सादरीकरणातून शिवचरित्राची प्रेरणादायी गाथा रसिकांसमोर उलगडली जाणार आहे.
शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ७.३० वाजता सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांचा Live Concert रंगणार असून रविवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ७.३० वाजता भव्य National Level Dance Competition आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे युवक-युवतींसाठी हा महोत्सव विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.
याशिवाय दि. १९ ते २३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागभीड शहरात प्रथमच PM Vishwakarma Exhibition पीएम विश्वकर्मा प्रदर्शनी नागभीड भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनीद्वारे जिल्ह्यातील कलाकार, कारागीर व उद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्याची आणि बाजारपेठ मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये दि. १५ फेब्रुवारी रोजी नंदी रथयात्रा, दि. १९ फेब्रुवारी रोजी रोग निदान शिबिर Health Camp Nagbhid, खिचडी वाटप तसेच भव्य मिनी बाजार व आकर्षक विद्युत रोषणाईची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, प्रगतिशील शेतकरी व समाजातील आदर्श घटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाशिवरात्री महोत्सव समितीने दिली.
याबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेवक तथा संयोजक गणेश तर्वेकर म्हणाले, “आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या विशेष सहकार्याने यावर्षी महाशिवरात्री महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवात नागभीड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
नागभीड व परिसरातील भाविकांसाठी Mahashivratri Festival 2026 at Shivtekdi Nagbhid हा श्रद्धा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा सोहळा ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.