Top News

Gayatri Shaktipeeth Chandrapur : नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न; 2027 मध्ये 251 Kundiya Gayatri Mahayagya

 Gayatri Shaktipeeth Chandrapur : नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न; 2027 मध्ये 251 Kundiya Gayatri Mahayagya




चंद्रपूर : स्थानिक श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ येथे आज ‘प्रखर प्रज्ञा – सजल श्रद्धा’ या दिव्य वातावरणात नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन अत्यंत उत्साह व भक्तिभावात पार पडले. शांतिकुंज, हरिद्वार यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य सूरतसिंह अमृते यांच्या पौरोहित्यात वैदिक मंत्रोच्चारात या प्रकल्पाची आधारशिला ठेवण्यात आली. Shantikunj Haridwar | Vedic Mantra Ceremony

या मंगलप्रसंगी माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सपना मुनगंटीवार उपस्थित होते. कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोद, लक्ष्मी अग्रवाल, सरकार, गिरीश चांडक, अरविंद सोनी, मनोहर टहलियानी, मुकेश भट्टड, अरुण शुक्ला, हिंदी ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी व संस्थापक अध्यक्ष विनोद तिवारी तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने गायत्री परिजन उपस्थित होते. Chandrapur News | Gadchiroli News | Social Event

हरिद्वार येथे आयोजित अखंड दीपक जन्मशताब्दी सोहळ्यात समयदान करणारे बंडू रोहणे व ईटनकर यांचा मंत्रदुपट्टा परिधान करून सन्मान करण्यात आला. Akhanda Deepak Yojana | Spiritual Service

विकासकामांची घोषणा व प्रशासकीय तत्परता

सुधीर मुनगंटीवार यांनी गायत्री शक्तिपीठच्या बांधकामासाठी २ लाख ५१ हजार रुपये वैयक्तिक निधी देण्याची घोषणा केली. तसेच भाविकांच्या सोयीसाठी शक्तिपीठाकडे जाणारा रस्ता एका वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही दिली. यासंदर्भात ७ फेब्रुवारी रोजी महाडा (MHADA) अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून रस्ता बांधकामाच्या कामाला गती दिली जाणार आहे. Infrastructure Development | Road Construction Update

भविष्यातील संकल्पना : २५१ कुंडीय यज्ञ व ‘वृंदावन पर्वत’

चंद्रपूरच्या पावन भूमीत २०२७ मध्ये २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. तसेच डोंगररांगांवर लाखो तुळशीची रोपे लावून ‘वृंदावन पर्वत’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. Tulsi Plantation Drive | Green Project | Environmental Initiative

भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समारंभादरम्यान गायत्री परिजनांचा उत्साह व श्रद्धा दिसून आली. भाविकांनी स्वेच्छेने ८ लाख रुपयांहून अधिक रोख देणगी दिली. तसेच अनेक भाविकांनी गिट्टी, सिमेंट व वाळू यांसारखी बांधकाम साहित्य वास्तुदान स्वरूपात देण्याचा संकल्प केला. Public Donation | Temple Development Fund

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या यशस्वी आयोजनासाठी श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. Maharashtra Religious News | Chandrapur Latest News




Previous Post Next Post