Top News

Banti Bhangdiya Felicitated with Samajratna Award | सामाजिक उत्तरदायित्वासह पुढे चला : भांगडिया

Banti Bhangdiya Felicitated with Samajratna Award | सामाजिक उत्तरदायित्वासह पुढे चला : भांगडिया


चंद्रपूरमध्ये माहेश्वरी समाजाचे जिल्हा अधिवेशन संपन्न


आमदार किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ‘समाजरत्न’ सन्मान





चंद्रपूर येथील महेश भवन, तुकुम येथे चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी संघटना, चंद्रपूर जिल्हा महिला संघटना तसेच चंद्रपूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच माहेश्वरी समाजाच्या जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.“बढते कदम – आओ बने मैं से हम” या संकल्पनेवर आधारित हे अधिवेशन अत्यंत सुबक, प्रेरणादायी आणि गरिमामय वातावरणात पार पडले.कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी समाजातील एकता, शिक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्माणातील सक्रिय सहभागाचे कौतुक करत मार्गदर्शन केले. तसेच चंद्रपूरमध्ये माहेश्वरी समाजासाठी सर्व सुविधांनी युक्त सामाजिक भवन उभारण्यासाठी निधी व सहकार्य देण्याचा संकल्प जाहीर केला.


यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी समाजबांधवांना संबोधित करताना सांगितले की, “समाजाने परस्पर सहकार्य, शिक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासत राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान द्यावे.”त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्यांची दखल घेत माहेश्वरी समाजाच्या वतीने आमदार किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ‘समाजरत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला.कार्यक्रमात पुणे येथील द्वारकाजी जालान यांच्या विशेष मार्गदर्शनपर भाषणाने अधिवेशनाला नवी दिशा मिळाली. अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा मध्यांचलचे उपसभापती विजय राठी व विदर्भ प्रदेशचे सचिव अजय मोदानी यांनी महासभेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सीए दामोदर सारडा यांनी अध्यक्षीय भाषणात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबंधूंचा परिचय करून दिला.


अधिवेशनादरम्यान शिक्षण, राजकारण आणि समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजबंधूंचा गौरव करण्यात आला. महिला संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी सादर केलेली महेश वंदना व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय केले.एकदिवसीय अधिवेशनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदविला. युवक व महिलांसाठी परिसंवाद तसेच मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष शिवनारायण सारडा, अधिवेशन संयोजक डॉ. सुशील मूंधडा, जिल्हा सचिव अजय काबरा, तालुका अध्यक्ष उमेश चांडक, मार्गदर्शक डॉ. जुगलकिशोर सोमानी, दिनेश बजाज, जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्षा राधिका मुंधडा, सचिव ज्योती मूंधडा, युवा संघटनेचे अध्यक्ष ऋषिकांत जाखोटिया, सचिव रुपेश राठी, चंद्रपूर माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा अलका चांडक, सचिव राणी कांकाणी, चंद्रपूर माहेश्वरी युवक मंडळाचे अध्यक्ष गोविंद राठी, सचिव अनूप गांधी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मंत्री यांनी केले तर अजय काबरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post Next Post