Top News

नगरसेवक मोहीत डंगोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; रक्तदान शिबिरात ५१ रक्तदाते, हळदी-कुंकू कार्यक्रमात १,१५० महिलांचा सहभाग

नगरसेवक मोहीत डंगोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; रक्तदान शिबिरात ५१ रक्तदाते, हळदी-कुंकू कार्यक्रमात १,१५० महिलांचा सहभाग




नागभीड :   नगरसेवक मोहीत डंगोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडविले. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. तब्बल १,१५० महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्य आणि महिलांच्या सहभागाचे प्रभावी दर्शन घडविले.


महिलांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक एकोप्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सायंकाळी स्नेहमेळावा व सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास चंदन सिंग चंदेल (माजी अध्यक्ष, वन विकास मंडळ), रेणुका दुधे (विधानसभा सदस्या), वैशाली जोशी (महिला अध्यक्ष, भाजपा), वर्षा सुंचूवार (महामंत्री, भाजपा महिला मोर्चा), जयश्री मोहुर्ले (महामंत्री, भाजपा), आरती अक्केवार (महामंत्री, भाजपा), अरविंद वर्मा (महामंत्री, भाजपा) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मोहीत डंगोरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनतेशी नाळ जपणारे, सामाजिक भान राखून काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शामला डंगोरे, रंजना गोरडवार, सुनंदा गोरघाटे, संगीता येंचलवार, सोनम वैद्य, विभा चौबे, प्राची बोमनवार, रेणुका टोटोली, भूमिका डंगोरे, अंजली उईके यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कृष्णा टोटोली, धनसिंग पटेल, अनिकेत दुबे, मनीष राजभर, हर्षल डंगोरे, रोहित चौबे, नीरज दुबे, राहुल बेंबांसी, शेख शकील, प्रतीक इनमुला, सोनू तुरणकर, गणेश काकडे, गोलू घुगरे, स्वप्नील घुसे यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झालेला हा वाढदिवस नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देणारा ठरला असून, समाजहितासाठी अशाच उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Previous Post Next Post