Big Breaking : चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का? मोठा नेता भाजपाच्या वाटेवर? मुख्यमंत्री भेटीच्या फोटोमुळे चर्चांना उधाण
चंद्रपूर | चिमूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. काँग्रेसचे विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.या भेटीवेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू, काँग्रेस जेष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर उपस्थित होते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया (बंटी भांगडिया), नगरसेवक अवेश पठाण तसेच भाजप नेते विलास विखार हे देखील दिसत आहेत.
या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले असून, या भेटीमागील नेमका उद्देश काय, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. डॉ. सतीश वारजूकर हे सध्या Indian National Congress (काँग्रेस) पक्षाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असल्याने या भेटीचे राजकीय परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनाही बळ मिळत असले तरी, यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वारजूकर आणि भारतीय जनता पक्ष (bjp ) या दोघांकळूनही अधिकृत भूमिका स्पष्ट होणे बाकी आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे चिमूर विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण तापले असून, येत्या लवकरच या भेटीमागील खरे कारण समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

