Top News

उमा नदीजवळील आकापूर टर्निंग पॉईंट अपघातांना कारणीभूत; तात्काळ उपाययोजनांची मागणी

उमा नदीजवळील आकापूर टर्निंग पॉईंट अपघातांना कारणीभूत; तात्काळ उपाययोजनांची मागणी



मुल |  उपजिल्हा प्रतिनिधी संदीप तेलंग : मूल – गडचिरोली मार्गावरील उमा नदीजवळ, आकापूर गावाच्या हद्दीतील टर्निंग पॉईंटवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून यामुळे गंभीर स्वरूपाची जीवितहानी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सदर टर्निंग पॉईंट अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून लहान-मोठी वाहने वारंवार पलटी होत आहेत.

अलीकडेच दोन ते तीन दिवसांपूर्वी एका खाजगी मोठ्या ट्रॅव्हल्स बसचा या ठिकाणी अपघात होऊन वाहन पलटी झाले. या दुर्दैवी घटनेत एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संदीप कारमवार, अध्यक्ष विविध  कार्यकारी सोसायटी तथा माजी सरपंच, आकापूर यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात टर्निंग पॉईंटच्या आधी रस्त्याच्या कडेला सुमारे १०० मीटर अंतरावर गतिरोधक तयार करण्यात यावेत, तसेच त्या गतिरोधकांवर उच्च दर्जाचे रेडियम लावण्यात यावे. यासोबतच टर्निंग रोडच्या बाजूला देखील रेडियम लावून वाहनचालकांना पूर्वसूचना देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, गडचिरोली येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Previous Post Next Post