Top News

महाराष्ट्र राज्य 21 वर्षाखालील व वरिष्ठ कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कु.आर्थिका संजय उपाध्ये ला सुवर्ण पदक प्राप्त

महाराष्ट्र राज्य 21 वर्षाखालील व वरिष्ठ कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कु.आर्थिका संजय उपाध्ये ला सुवर्ण पदक प्राप्त 



भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार :   महाराष्ट्र राज्य 21 वर्षाखालील व वरिष्ठ कराटे अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस सारख्या ग्रामीण भागातील कु. आर्थिका संजय उपाध्ये हिने उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 17 व 18 जानेवारी 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.राज्यभरातून आलेल्या नामांकित व अनुभवी कराटेपटूंशी दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विनय बोढे सरांची शिष्या कु. आर्थिका हिने आत्मविश्वास, तांत्रिक अचूकता, वेग आणि शिस्तबद्ध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्धींवर वर्चस्व गाजवत तिने अंतिम फेरीत दमदार विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.स्पर्धेदरम्यान कु. आर्थिका हिच्या खेळातील संयम, ताकद, वेळेचे अचूक भान आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा ठसा स्पष्टपणे दिसून आला. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, प्रशिक्षक, मित्रपरिवार तसेच क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.या उल्लेखनीय यशाबद्दल कु. आर्थिका हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ती महाराष्ट्राचे नाव उज्वल करेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे सुवर्ण पदक अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारे आहे. 

Previous Post Next Post