विशेष सक्षमांच्या सक्षमीकरणासाठी SAIL–CFP चा उपक्रम.....आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त श्रवणयंत्रांचे वाटप....
कार्यक्रमाच्या प्रारंभी उमेश एम. उके, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) यांनी उपस्थितांचे स्वागत करत CFPतर्फे यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध CSR उपक्रमांची माहिती दिली.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी CFPचे कार्यकारी संचालक पी. मुरुगेसन होते तर डी.व्ही. रवी चंदर, मुख्य महाव्यवस्थापक (मेंटेनन्स) व अतिरिक्त प्रभार CGM (M&C); आर. डी. गायकवाड, CGM (वर्क्स); तसेच प्रवीण कुमार एल., GM (HR) हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. श्रवणयंत्र वितरणाची जबाबदारी Artificial Limb Manufacturing Corporation (ALIMCO) यांनी चंद्रपूर दिव्यांग कौशल्य विकास केंद्राच्या सहकार्याने पार पाडली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पी. मुरुगेसन यांनी सांगितले की, विशेष सक्षमांना सक्षम, आत्मविश्वासी आणि स्वावलंबी बनवणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे CFPच्या सर्व CSR उपक्रमांचे मुख्य ध्येय आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्दिष्टाने CFP सातत्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी शकील अहमद खान, कनिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) यांनी आभारप्रदर्शन केले. SAIL–CFPच्या मानव संसाधन विभागाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित केला.


